F

फक्त अर्ध्या एकरातून मिळवला 12 लाखाचा नफा! प्रगतशील शेतकऱ्यानी घेतले अग्रेसर उत्पादन; पहा सविस्तर;

 

फक्त अर्ध्या एकरातून मिळवला 12 लाखाचा नफा! प्रगतशील शेतकऱ्यानी घेतले अग्रेसर उत्पादन; पहा सविस्तर;


                                                                    Click Her

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधीलच औरंगाबाद जिल्ह्यात स्थायिक असणाऱ्या एका शेतकरी मित्रानी एक चांगली कामगिरी केली असून आता तो प्रगतशील शेतकरी झाला आहे. त्यांनी त्यांच्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये कस्टर्ड ॲप्पल म्हणजेच सीताफळाची लागवड केली आहे. त्यातून अग्रेसर उत्पन्न मिळवले. विशेष बाब सांगायची झाली तर फक्त अर्ध्या एकराच्या सीताफळ बागेतून तब्बल बारा लाखांचा नफा त्याने मिळवला आहे.


  • सीताफळाची माहिती 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये व त्या तालुक्याच्या आसपास बऱ्याच दिवसांपासून दुष्काळ परिस्थिती शेतकऱ्यांवर निर्माण झाली. या कारणांमुळे शेतकरी मित्रांना सतत अपयशासमोर सामोरे जावे लागले. मात्र त्या जिल्ह्यातीलच रहिवासी व्यक्ती संजय कणसे यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. शेतीच्या बाबतीत योग्य नियोजन योग्य माहिती घेऊन त्यांनी अर्धा एकरावर सीताफळ लागवड केली आणि लाखोंचा नफा मिळवला. त्यांच्या बागेतून शेवटी 11 टन इतके सिताफळ निघाले असून त्याची विक्री त्यांनी केली आणि भरघोस नफा मिळवला.

  • सीताफळ शेती

संजय कणसे हे एक अल्पभूधारक शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी आहेत. आतापर्यंत कणसे पारंपारिक शेती पीक पद्धती वापरत होते परंतु सध्याच्या बदलता योगा नुसार त्यांनी थोडा वेगळा विचार करून त्यांच्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये 2016 साली सीताफळाची लागवड केली आणि इतर जो भाग शिल्लक होता तिथे गोड लिंबाची लागवड केली. कणसे रावांनी 16 बाय 16 फुटावर तब्बल 600 रोपांची लागवड केली. लागवड केल्या नंतर कित्येकदा दुष्काळी संकटाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी त्यातून मार्ग काढला बागेची योग्य देखभाल करून व्यवस्थितपणे त्यांनी शेतमाल तयार केला आज त्यांच्या एका झाडावर 35 ते 40 किलो इतकी फळे येतात.


custard apple variety in Maharashtra


  • शेतकऱ्याला चांगला दर मिळत आहे

मागील तीन वर्षापासून कणसे राव उत्पादन घेत असून यावर्षी त्यांनी अर्ध्या एकरामध्ये सिताफळच्या पिकातून वीस टनाचे उत्पादन मिळवले. यामध्ये त्यांना प्रति किलोमागे 110 रुपये इतका दर मिळाला आणि या शेतकऱ्याला 12 लाखाचा नफा झाला आतापर्यंत बघितले तर 11 टनाचे विक्री झाली असून नऊ ते दहा टन फळे अजून झाडावर शिल्लक आहेत.


Custard apple yield per tree


  • किती खर्च आला

कापणी केल्यानंतर पुढील चारच दिवसांमध्ये आपल्या शेतातील सीताफळ खाण्यास तयार होते. एका फळाचे वजन हे 500 ग्रॅम पासून सातशे ग्रॅम पर्यंत आहे. या पिकाच्या लागवडीसाठी व नियोजनासाठी आतापर्यंत कणसे यांना 80 ते 90 हजार रुपये इतका खर्च आला. असून या फळाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर एकाच मिलीबग या रोगाशिवाय या पिकावर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही. सुरुवातीला मुसळधार पाऊस झाल्यामुळे फळधारणा होत असताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु कृषी क्षेत्रांमधील तज्ञ लोकांच्या सल्ल्यामुळे कणसे यांना सीताफळाच्या लागवडीत अग्रेसर उत्पादन मिळवले आहे.



Tags  

    
     shetinews.html



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.