F

Online Land Maps : गट नंबर टाकून आपल्या जमिनीचा नकाशा मोबाईलवर डाऊनलोड करा फक्त 5 मिनिटात !



Land Survey Maps Online Maharashtra :

               देशभरातील शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध सुविधा जन पुरविलल्या आहेत. यामध्ये आणखी एक नव्याने सुविधा शासन शेतकऱ्यांसाठी पुरवत आहे. आता आपल्या शेत जमिनीचे सर्व रेकॉर्ड आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहेत. या सोबतच आपल्या शेतजमिनीचा नकाशा देखील आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येणार, सर्वे नंबर किंवा गट नंबर नुसार आपल्या शेत जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड कशाप्रकारे करायचा त्याबद्दल आपण आजच्या लेखामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. कृपया आलेख आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा..

Land Record Check Online:

संलग्न जमीन असलेल्या शेतकऱ्यांमध्ये जमिनीबाबत कायमच वाद झालेले आपल्याला दिसून आले आहेत. हे वाद इतके वाढतात की या वादामुळे शेतकऱ्यांना कोर्टाची पायरी देखील चढावी लागते. अशावेळी शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा, खाते उतारा, शेत जमिनीचा नकाशा इत्यादी गोष्टी त्वरित काढाव्या लागतात किंवा इतर काही कारणास्तव ही कागदपत्रे, नकाशा इत्यादी गोष्टी काढाव्या लागतात. अशावेळी शेतकरी तहसील कार्यालयामध्ये जातान पण वेळेवर त्यांना ही कागदपत्रे किंवा शेत जमिनीचा नकाशा भेटत नाही. त्यांना तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लागतात. अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हे कागदपत्रे मिळवायला वेळ लागतो. अशावेळी आता शेतकरी आपल्या शेती जमिनीचा नकाशा व इतर कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने काढू शकणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल व खर्च देखील वाचेल.


Land Survey Map Online Maharashtra.

भूमि अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमिनीचा ऑनलाईन नकाशा काढण्यासाठी सॅटॅलाइट चा वापर केला जात आहे. या माध्यमातून भुमिअभिलेखाच्या रेकॉर्डमध्ये शेत जमिनीच्या नकाशाचे चित्रीकरण होते आणि ते आपल्याला मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येते. अगदी गट नंबर टाकून सुद्धा आपण आपल्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करू शकतो.


Land Record Maharashtra.


मित्रांनो आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा डाऊनलोड करण्यासाठी पुढील दिलेल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपले राज्य, आपला जिल्हा, गाव, तालुका इत्यादी माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे आणि पुढे सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करायचा आहे..


Land Survey Maps Online Maharashtra.

या ठिकाणी क्लिक करून आपल्या शेत जमिनीचा नकाशा मोबाईलवर डाऊनलोड करा.


[https://bhulekh.mahabhumi.gov.in/)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.