F

बिपरजॉय (Biparjoy) चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसणार का?

 

               

अरबी समुद्रातील बिपरजॉय (Biparjoy) चक्रीवादळ हे ताशी १५० किमी वेगाने वाहत आहे. हे वादळ गुजरात वरून समोर राजस्थान कडे जात आहे. त्यामुळे तेथील ४-५ जिल्हाना रेड अलर्ट (Red Alert) देण्यात असून १४-१५ जिल्ह्यांमध्ये Orange Alert आहे.


खरतर या वादळाचा तडाखा महाराष्ट्राला आणि गुजरातच्या किनारपट्टीला बसेल अशी भीती होती, मात्र वादळाने मार्ग बदल्याने ते गुजरात वरून सरळ कराचीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. यामुळे त्याभागत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे

 

पुढचे 48 तास धोक्याचे

पुढील ४८ तासात हे बिपरजॉय वादळ आणखी जास्त रूप धारण करून राजस्थान मध्ये प्रवेश करेल अशा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राजस्थान मधील ४-५ जिल्ह्यांमध्ये (बाडमेर,जोधपूर,जलोट,नगोर, व पली) या जिल्ह्यांमध्ये या वादळाचा तडाखा बसेल असा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. या ५ जिल्ह्याच्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दर्शविली आहे. या वादळाचा ताडखा १७ जून रोजी राज्यात जाणवेल असा अंदाज आहे.

या वादळाचा परिणाम आपल्या महाराष्टराला जाणवत आहे. यामुळे आपल्या राज्यात वारे हे फार वेगाने वाहत आहे. गुजरात मध्ये या वादळाचा तडाखा विद्युत खात्याला बसला आहे, कारण सुमारे १० हजार विद्युत पोल पडले आणि त्यामुळे लाखो गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर या वादळामुळे ७०.०००  नागरिकांना स्तलांतर करण्यात आले आहे.

सध्या मान्सून महाराष्ट्रात पोहोचला असला तरीही त्याचा प्रवास तळकोकणातून पुढे अपेक्षित वेगानं होत नाहीये. त्यामुळं मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये उष्णतेचा कहरदेखील जाणवणार आहे. शेतकरी मान्सूनची  अगदी आतुरतेने वाट पाहत आहे.

२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.