F

पंजाब डख यांच्या मते कसा राहिला यंदा मान्सून


                             या वर्षी दुष्काळाचे सावट असल्याचाअनेक संस्थांचा अहवाल सध्या शेतकऱ्यांची झोप उडवत आहे. मात्र या वर्षीभरपूर पाऊस पडेल, असा ठाम विश्वास हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

               येथे दाबा

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, यावर्षी आठ जूनला मान्सून मुंबईत येणार आहे. मात्र यावेळी फक्त मान्सूनचे आगमन होईल आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहचेल. २७ ते ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. ज्या शेतकऱ्यांच्या या कालावधी मध्ये पेरण्या होणार  नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे. या वर्षी जूनच्या तुलनेत जुलैमध्ये अधिक पाऊस राहील. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर, आणि ऑक्टोबरमध्ये अधिक पाऊस राहील असे डख सर यांनी नमूद केले आहे.2022 सारखाच यंदाचा मान्सूनही शेतकऱ्यांसाठी चांगला राहील, असे ते म्हणाले.

                  मागील वर्षी पेक्षा अधिक पाऊस यंदा राहील,असेही त्यांनी सांगितले. भविष्यात या भागात अधिक पावसाची शक्यता असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतकऱ्यांना शेताच्या कडेला चर खोदावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गोदावरी नदी व डवा कालव्याच्या सिंचनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जायकवाडी धरण भरेल की नाही, याबाबत डक सरांना शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.यावर ते म्हणाले की, जायकवाडी प्रकल्प यंदा लवकरच भरेल आणि दोन वेळेस गेट उघडून पाणी सोडावे लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.