F

Wheat Market Price | देशातील सर्वात महागडा गहू! या गव्हाला सध्या बाजारात मिळतो 4000 रुपये प्रति क्विंटल दर;

 

                                



April 17,2023 By Shetkari

सीहोरच्या शरबती गव्हाची किंमत इतर गव्हाच्या जातीपेक्षा खूप जास्त असते. जिथे स्थानिक पदधतीचा व इतर जातींचा गहू 1800 पासून 2500 रुपयांपर्यंत विकला जातो. तर दुसरीकडे शरबती गव्हाचा दर 4000 रुपयांपर्यंत बाजारात विकला जातो. इतर जातींच्या गव्हामध्ये व शरबती गव्हामध्ये खूप अंतर असते शरबती गव्हामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वेही जास्त प्रमाणात असतात.

देशात आणि जगात मध्य प्रदेशामधील उत्पादीत केला जाणारा सीहोर शरबती गहू खूप प्रसिद्ध आहे. उत्कृष्ट प्रकारची चव आणि सोन्यासारखी दिसणारी चमक ही या गव्हाची ओळख आहे. सगळ्यां पासून असलेला वेगळेपणा यामुळे या गव्हाला बाजारात नेहमीच चांगली मागणी असते. सिहोरच्या या गव्हाला आता केंद्र सरकारकडून GI टॅग मिळालेला आहे.शरबती गव्हाला अर्ज क्रमांक 699 संदर्भात GI हा टॅग सिहोर जिल्ह्याच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार देण्यात आला आहे.

देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये या गव्हाला चांगली मागणी आहे, कारण या गव्हाला बाजारामध्ये चांगला भाव मिळत आहे. या गव्हाची किंमत इतर वाणांपेक्षा नेहमी जास्त असते. ज्या ठिकाणी शरबती गहू हा 4000 रुपये क्विंटलने विकला जातो. तर त्याच ठिकाणी स्थानिक आणि इतर प्रकारचा गहू हा 1800 पासून 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जातो. हा गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या गव्हामध्ये प्रोटीन,फायबर,जीवनसत्त्वे B आणि E अधिक प्रमाणात आढळतात. हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात.

कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे केले अभिनंदन :

कृषी हवामानशास्त्र विस्तार अधिकारी डॉ. S.S.तोमर यांनी असे सांगितले की शरबती गव्हाला GI टॅग मिळाल्यामुळे शेतकरी अभिनंदनास पात्र आहेत असे ते म्हणाले.या ठिकाणी शरबती गव्हातील प्रथिने योग्य व पाहिजे अश्या प्रमाणात आढळतात. त्याच बरोबर सीहोरच्या जमिनीमध्ये आणि पाण्यात गहू चांगल्या प्रकारे चमकुन दिसतो. अशा प्रकारे या ठिकाणी पिकवलेल्या गव्हाला संपूर्ण देशभरात मागणी आहे.

GI टॅग म्हणजे काय?

GI म्हणजे भौगोलिक संकेत हा लेबलचाच एक प्रकार मानला जातो, यामध्ये उत्पादनाला विशेष प्रकारची भौगोलिक ओळख मिळाली जाते. भारतीय संसदेमध्ये १९९९ साली याची नोंदणी आणि संरक्षण कायद्यांच्या अंतर्गत “वस्तूंचे भौगोलिक संकेत” लागू करण्यात आलेला आहे. या टॅग च्या अंतर्गत भारतातील कोणत्याही प्रदेशात आढळन्यात येणाऱ्या एखाद्या विशिष्ट वस्तूचा कायदेशीर पद्धतीने त्या राज्याला त्याचा अधिकार दिला जातो. सोप्या शब्दात बोलायचे झाले तर कोणत्याही प्रदेशाचे प्रादेशिक उत्पादन हे त्या प्रदेशाची ओळख असते. जेव्हा या उत्पादनाची कीर्ती देशामध्ये व जगातमध्ये पसरते, तेव्हा त्यांना प्रमाणित करण्यासाठी ची प्रक्रिया असते त्याला GI टॅग किंवा भौगोलिक निर्देशक म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.